बेला :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवरगाव येथे ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत महाल्ले होते. यावेळी गट ग्रामपंचायत ,डोडमा येथील सरपंच वामनराव घोडमारे, उपसरपंच संदीप जडीत, पोलीस पाटील प्रशांत गमे, केंद्रप्रमुख महेंद्र पारसे, शाळा समितीच्या उपाध्यक्ष रिता घोडमारे, मुख्याध्यापिका प्रतिभा कनिरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप करारे, जागेश्वर घोडमारे, तेजराम कडू, किरण इंगोले, पंकज शहाणे, संजय गमे, अमोल माहुरे, सुरेश माहुरे, प्रभाकर करारे प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत महाल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत, राज्य गीत, झेंडा गीत, संविधान प्रास्ताविकेचे वाचन झाले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रतिभा कनिरे यांनी सादर केले. शाळेतील विद्यार्थी अंशुल वामन घोडमारे, कार्तिक प्रशांत गमे, ऋषी बावणे, क्रिश निंबुळकर, माजी उपसरपंच शांताराम माहुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
उन्नती शांताराम मोहुरे हिने प्रेक्षकांमध्ये जाऊन दाताचं दातवन हे गीत सादर केल्याने कार्यक्रमात नवचैतन्य निर्माण झाले.वेदांती प्रशांत महाल्ले, मनस्वी जगदीश गमे, प्रियल मुकेश काळे, लावण्या किसनाजी निंबुळकर,जिया कैलास इंगळे या विद्यार्थिनींनी वैयक्तिक नृत्य सादर करून वाहवा मिळवली.सरपंच वामनराव घोडमारे व पोलीस पाटील प्रशांत गमे यांचा सत्कार करण्यात आला. तीळसंक्रांति निमित्य महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. रीता घोडमारे हिला नींबू चम्मच स्पर्धेत, लक्ष्मी रुपेश बोंद्रे हिला बटाटा शर्यतीमध्ये तर पल्लवी माहुरे हिला संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कार्तिक गमे व अंशुल घोडमारे यांनी केले. सहाय्यक शिक्षक तुळशीराम रामाजी हूंगे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी वंदना तिजारे, प्रशांत भागवत, तुळशीराम हुंगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.