संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रमानगर उडानपूल बांधकाम दरम्यान कामठी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भीमनगर येथील पाणी जलशुद्धीकरण केंद्राची पाईप लाईन अडसर ठरत असल्याने ही पाईप लाईन दुसऱ्या मार्गाने वळती करण्यासाठी कामठी नगर परिषद तर्फे पाणी पुरवठ्याला शहरात दोन दिवस ब्रेकडाऊन राहणार असल्याचे कारण सांगून पाईप लाईन वळती करण्याच्या कामाला गती देण्यात आली मात्र आज पाच दिवस लोटूनही हे काम पूर्णत्वास न आल्याने या पाईप लाईन मार्गाने होणारा पाणीपुरवठा खंडित असून जलसेवा ठप्प असल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे घरी नळ तरी रड अशी स्थिती झाली असून पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती होत आहे.भर उन्हात पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.तेव्हा नागरिकांच्या रागाचा अंत न पाहता कामठी शहरात मागील पाच दिवसापासून ठप्प असलेला पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आज मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.याप्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान, माजी नगरसेवक नीरज लोणारे आदी उपस्थित होते.
यावर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पाईप लाईन चे काम अंतिम टप्प्यात सुरू असून शहरातील काही भागात होत नसलेल्या पाणी पुरवठा येत्या तीन दिवसात सुरळीत होईल असे आश्वासित केले.