– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव
– जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचाही सन्मान
नागपूर :- सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलनामध्ये उत्कृष्ठ निधी संकलनासाठी आज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ध्वज़दिन निधी कल्याण समिती डॉ. विपीन इटनकर तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यासाठी सशस्त्र सेना ध्वज़दिन 2023 निधी संकलनाचे 1 कोटी 91 लाख 98 हजार रुपये इतके उदिष्ट प्राप्त झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालये, स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्ह्याने 3 कोटी 9 लाख 77 हजार रुपये इतके (161.35 टक्के) उद्दिष्ट गाठले आहे. त्याबद्दल उभयतांना सन्मानित करण्यात आले आहे.