संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील सुफी लाईन सुफी नगर कामठी रहिवासी मोहम्मद सुलतान यांच्या साडे पाच वर्षोय चिमुकल्या आसर अहमद मोहम्मद सुलतान ने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50 पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. आसर अहमद मोहमद सुलतानने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.
जनहितासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून आसर अहमदने सर्वत्र शांती व अमन राहावे या साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकल्याने पहिला रोजा ठेवल्याबद्दल आसर अहमद मोहम्मद सुलतान याचे आई, वडील,व कुटुंबिया कडून सर्वत्र कौतुक होत आहे.
मुस्लिम समाज रमजानच्या पवित्र महिन्यात उपासनेला विशेष महत्व देतो .मुस्लिम समाजातील पाच मुख्य घटकामध्ये कलमा पठण, नमाज,उपवास ,जकात ,हज करणे हे प्रमुख घटक आहेत.इस्लाम मध्ये रमजान हा सर्वात पवित्र महिना मानला जातो.हा महिना चंद्र पाहून ठरविला जातो.मुस्लिम धर्माचे लोक या रमजानच्या संपूर्ण महिन्यात उपवास ठेवतात आणि सुर्योदयापासून ते सुर्यास्ता पर्यंत काहीही खात नाही .