नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत दिव्यांग बांधवांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता तसेच दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे वैयक्तिक दिव्यांग लाभार्थ्याला १ लाख रुपये तसेच सामुहिक बचत गटांना स्वयं रोजगाराकरिता रुपये ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येते असून, योजनेचा अधिकाधिक संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, यावर्षी नागपूर शहरातील दिव्यांगासाठी सखोल सर्वेक्षण करण्याचा मनपाचा मानस असून, दिव्यांगाशी निगडीत भौतिक माहितीसोबत त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थिती बरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता व त्यांची नैसर्गिक आवड व क्षमता प्रमाणे नवीन योजना सूरू करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागांतर्गत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यातील दिव्यांग बांधवांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरिता तसेच दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य योजना असून, याद्वारे वैयक्तिक दिव्यांग लाभार्थ्याला १ लाख रुपये तसेच सामुहिक बचत गटांना स्वयं रोजगाराकरिता रुपये ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येते आहे. याकरिता वय वर्ष १८ ते ४५ वर्ष या वयोगटातील ४० टक्के किंवा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग बचत गट तसेच स्वयंरोजगार करणारे दिव्यांग पात्र आहेत. लाभार्थ्यांना थेट डीबीटी तत्वावर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वळते येते, योजनेच्या सुधारित निकषानुसार प्रथम टप्प्यात ५० टक्के रक्कम तसेच लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरु केल्यानंतर विभागाची मौका चौकशी अंती ५० टक्के रक्कम देण्यात येते. त्यामध्ये लाभार्थ्यांचे हिस्सा ५ टक्के निर्धारित करण्यात आला आहे.
वैयक्तिक दिव्यांग लाभार्थ्याला १ लाख रुपयेचा प्रथम टप्पा ४५ हजार रुपये, दुसरा टप्पा ५० हजार रुपये व लाभार्थी सहभाग ५ हजार रुपये असा असणार आहे. तरी सदर योजनेचा अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
सर्व दिव्यांगांना घरबसल्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा व अधिकाधिक दिव्यांग बांधवानी योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.