अखेर गट ग्रा.पं गांगनेर(हिवरा) सरपंच प्रदीप राऊत यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश

कोदामेंढी :- तारसा – बाबदेव जि.प. क्षेत्र व तारसा पं.स.क्षेत्र परिसरात येणाऱ्या गट ग्रा.पं.गांगनेर(हिवरा) अंतर्गत येणाऱ्या गांगनेर-हिवरा नदीवरील पुल कम बंधारा मंजूर करण्यासाठी मागील चार वर्षांपासून संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधीना ठराव व निवेदन देऊन सतत पाठपुरावा केल्याने सरपंच प्रदीप राऊत यांच्या प्रयत्नाला यश आले असून अँड.आ.आशिष जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने सदर कामाला १ करोड ७९ लक्ष रूपये मंजूर झाल्याचे सरपंच राउत यांनी सांगितले.                नुकतेच सरपंच प्रदीप राऊत यांच्या हस्ते सदर कामाचे भुमिपूजन करण्यात आले व बांधकामांची सुरुवात करण्यात आली. या भुमिपूजन कार्यक्रमाला उपसरपंचा निलीमा घरजाळे , बंडू घरजाळे, विष्णू सोनसरे, ईश्वर सोनसरे, दिगांबर राऊत, बबन सोनसरे, जागेश्वर राऊत, विलास राऊत, सुरेश घोडाकाडे, पिंटू राऊत, अशोक गुजरकर, सुशिल राऊत, बाळकृष्ण राऊत, नितीन राऊत, गंगाधर राऊत, दिलीप सिरसाम, भाऊराव मेश्राम, श्रीधर वाघमारे, ऑपरेटर रोशन राऊत, कर्मचारी कवडू खंडाळे, बबलू खंडाळे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

24 वे सामुहिक बाल संस्कार शिविर ज्ञानयज्ञ का हुआ समापन

Mon Jun 5 , 2023
नागपुर :- श्री कुन्दकुन्द दिगम्बर जैन स्वाध्याय मंडल ट्रस्ट एवं अखिल भारतीय जैन युवा- महिला फेडरेशन नागपुर के तत्वावधान में आयोजित एवं स्व. राधाबाई गणपत मारवडकर परिवार के विशेष सहयोग से आयोजित 24 वे सामूहिक बाल संस्कार शिविर ज्ञानयज्ञ का आज श्री महावीर दिगम्बर जैन मंदिर नेहरू पुतला इतवारी नागपुर में समापन हुआ। जैन दर्शन के मूलभूत सिद्धान्त, मुनि धर्म […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com