अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- आमगाव नगर परीषद क्षेत्रातील पदमपुर येथील ४२ वर्षीय मोहन शेंडे हे आपल्या सुमो गाडीने १०ऑगस्ट रोजी रात्री ८ चा सुमारास तेरावीच्या कार्यक्रमासाठी आपल्या दोन मित्रासह शिवनी येथे जात असताना किंडगीपर जवळील नाल्याच्या प्रवाहात सुमो कार वाहून गेली, त्याचे दोन मित्र बचावले मात्र मोहन शेंडे आपल्या सुमो गाडीसह वाहून गेला.
काल सुमो गाडी मिळाली मात्र मोहन चा थांगपत्ता लागला नव्हता. मात्र आज सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह शोधकार्य करीत असताना आढळला. सध्या मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.