नागपूर :- न्यू मनिशनगर,मौसम कॉलनी येथे दुपारी २:३० वाजे दरम्यान सुनीता शेंद्रे नामक महिलेला साडे सहा फूट मोठा काळा साप अपार्टमेंट मधून निघतांना दृष्टीस पडला तिथेच बाजूला लहान मुले खेळत होती अपार्टमेंट मधून निघून साप विनायक नंदनवार यांच्या घरात कंपाऊंड मधे शिरला …लगेच सुनीता शेंद्रे यांनी सर्पमित्र ,प्राणीमित्र ,वन्यजीव रक्षक,चैताली भस्मे यांना फोन करून बोलावले सर्व नागरिकांन मद्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
वेळ वाया न घालवता चैताली ने खूप सावधानतेने साडे सहा फूट कोब्रा ला सुरक्षित रेस्क्यू केले.. साप खूप चिडलेला आणि दंश करण्याच्या मनःस्थितीत होता परिसरातील सर्व लोकांनी साप रेस्क्यु होताच सुटकेचा निःश्वास टाकला. याआधी पण चैताली ने मौसम कॉलनी मधे बऱ्याच सापांना जीवनदान दिले आहे. शेती च्या प्लॉट वर घरे बांधल्या गेली आणि सापांची घरे नष्ट झाली म्हणून साप उन्हाळ्याच्या दिवसात गारवा शोधण्यासाठी,भक्ष शोधण्यासाठी मनुष्य वस्तीत शिरतात अशी माहिती सर्पमित्र चैताली यांनी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.सापाला सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.