शासकीय कार्यालयाचे नाव वापरून खेळाडूचा स्पर्धेत प्रवेश करने भोवले, पारशिवनी तालुका क्रिड़ा समितीवर कार्यवाही करण्याची महासंघची मागणी

नागपुर :- तालुका क्रिड़ा संकुल पारशिवनी या शासकीय कार्यालयाच्या नावाने स्थानिक खेळाडूला मैदानी स्पर्धेत प्रवेश देवून स्पर्धा खेळविने स्थानिक तालुका क्रिड़ा समितीला चांगलेच भोवले आहे . माहितीं अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी जिल्हा क्रिड़ा अधिकारी कार्यालयकडून माहीती अधिकारात प्राप्त माहितीं व त्यांच्या कार्यवाही अहवालच्या माहितीं नुसार या प्रकरणाची क्रिड़ा आयुक्त , क्रिड़ा संचालक, क्रिड़ा उपसंचालक, शालेय शिक्षण व क्रिड़ा विभाग ,मंत्रालयचे मुख्य सचिव यांना लेखी तक्रार देवून पदाचा दुरुपयोग करून ग़ैरप्रकार करणाऱ्या पारशिवनी तालुका क्रिड़ा समितीवर कार्यवाही करून समिती रद्द करण्याची मागणी केली आहे . या प्रकरणाची क्रिड़ा क्षेत्रात सर्वत्र चर्चा होत असून या समितीवर शासन व प्रशासन द्वारे क़ाय कार्यवाही करण्यात येईल , याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

सविस्तर वृत्र अशे की , नागपुर जिल्हा अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील एथेलटिक्स खेळाडू अजय ( बदलेले नाव ) हा मनसर (रामटेक) येथील शाळेचा विद्यार्थी असून सध्या एका स्थानिक क्रीड़ामार्गदर्शक कड़ें तालुका क्रिड़ा संकुल पारशिवनी येथे प्रशिक्षण घेत आहे .

सन 2022 मध्ये नागपुर जिल्हा एथेलटिक्स असोसिएशन अंतर्गत पार पडलेल्या जूनियर सेलेक्शन ट्राइल्स मध्ये या खेळाडूने सोळा वर्षे खालील मुले या वयोगटमध्ये सहभागी होंवून गोळा फेक व थाली फेक खेळ प्रकार मध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तर स्पर्धेसाठी पात्र झाला होता. या नागपुर जिल्हा स्तर स्पर्धेत शेखऱ कोलते हे नागपुर जिल्हा एथेलटिक्स असोसिएशनच्या अधीनस्थ पंच / ऑफिशयल म्हणून सर्व थ्रोइंग इवेंट्सचे काम पाहत होते . या प्रकरणात संशय आल्याने कोलते यांनी सोळा वर्षे खालील वयोगटमध्ये मुलांचे स्कोर शीट तपासून पाहिल्यावर यात या खेळाडूने चक्क तालुका क्रिड़ा संकुल पारशिवनी या शासकीय कार्यालयच्या नावानेच स्पर्धेत प्रवेश घेतल्याचे निदर्शनात आले. तालुका क्रिड़ा संकुल किंवा जिल्हा क्रिड़ा अधिकारी कार्यालय हे आपल्या अंतर्गत स्पर्धा आयोजन करतात , परंतु आपल्या शासकीय कार्यालयच्यां नावाने खेळाडूची नोंदणी करून कोणत्याही स्पर्धेत त्यांची प्रवेशिका पाठवित नाहीच आणि तशे कोणतेही नियम नसून त्यानां तशे अधिकारही नाही,हे कोलते यांना माहित असल्याने त्यांनी पुरावें म्हणून जिल्हा क्रिड़ा अधिकारी नागपुर यांच्याकड़ें माहितीचा अधिकार अर्ज करून माहितीं घेतली असता प्राप्त माहितीं नुसार या खेळाडूला तालुका किंवा जिल्हा कार्यालयने अशी कोणतीही नोंदणी किंवा अश्या कोणत्याही स्पर्धेसाठी प्रवेशिका दिलेच नसल्याचे व या खेळाडूने परस्पर चक्क शासकीय कार्यालयचें नाव वापरून त्या स्पर्धेत प्रवेश मिळविल्याची धक्कादायक बाब उघड़ झाली .

यावर कोलते यांनी जिल्हा क्रिड़ा अधिकारी , नागपुर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून कार्यवाहिची मागणी केली असता जिल्हा क्रिड़ा अधिकारीच्या चौकशी अहवाल पत्रानुसार या प्रकरणात तो खेळाडू दोषी नसून तालुका क्रिड़ा संकुल पारशिवनी अंतर्गत गठित असलेली तालुका क्रिड़ा समितिचे पदाधिकारी व क्रिड़ा मार्गदर्शक यांनीच आपल्या पदाचा दुरुपयोग करीत या शासकीय कार्यालयाचे नाव वापरून त्या खेळाडूची परस्पर प्रवेशिका पाठवून त्या स्पर्धेत खेळाडूचा प्रवेश केल्याची पुन्हा एक नवीन धक्कादायक बाब उघड़ झाली आहे .

समितीला अशे अधिकारच नाहीत…

शासनाचे शासन निणर्य व परिपत्रके , कायदा , क्रिड़ा संहिता , शासनाचे क्रिड़ा धोरण किंवा अन्य कोणत्याही नियमानुसार तालुका क्रिड़ा समितीला तालुका क्रिड़ा संकुल किंवा जिल्हा क्रिड़ा अधिकारी कार्यालय या शासकीय कार्यालये व क्रिड़ा समितीचे नाव वापरून कोणत्याही खेळाडूचा अश्या कोणत्याही स्पर्धेत सहभाग नोंदणी करने , तशी शिफारस करने किंवा प्रवेशिका पाठविन्याचा मुळीच अधिकार नाही. अर्थात पारशिवनी येथील क्रिड़ा संकुलच्यां तालुका क्रिड़ा समितीने शासनाने निहित केलेल्या कार्य, कर्तव्ये व जवाबदारीच्या मर्यादेच्या बाहेर जावून , नियमांचे सर्रास उलंघन करून व आपल्या कार्यालयीन पदाचा दुरुपयोग करून हा बेकायदेशीर ग़ैरप्रकार केल्याचे पूर्णता सिध्द झाले आहे . अशे कोलते यांनी सांगितले आहे .

डीएसओ द्वारे प्रकरणाची सावरासावर

या प्रकरणात तालुका क्रिड़ा समितिचा ग़ैरप्रकार पूर्णता सिद्ध होवूनही जिल्हा क्रिड़ा अधिकारी द्वारे समितीवर कोणतीही प्रशासकीय कार्यवाही न करता या प्रकरणाला सावरासावर करण्यासाठी जाणीवपूर्वक पांघरुन घालण्याचे कट केल्या जात असल्याची चर्चा स्थानिकामध्ये जोरात सुरु झाली आहे . सोबतच हे प्रकरण दाबन्यासाठी जिल्हा क्रिड़ा अधिकारी यांच्यावर काही राजकिय प्रवृत्ति कडून दबाव किंवा खपाव तंत्राचा वापर केल्या जातो की क़ाय अशी शंका सुद्धा व्यक्त केली जात आहे . काही महिने पूर्वीच त्या खेळाडूला ग़ैरप्रकार केल्याप्रकरणी स्थानिक एका स्पोर्ट्स क्लब मधुन काढण्यात आल्याने अन्य कोणतेही क्लब व स्पोर्ट्स अकेडमी त्याला प्रवेश देत नव्हते , यामुळे तालुका क्रिड़ा समिती व क्रिड़ामार्गदर्शक यांनी त्या खेळाडूची आर्थिक लाभापोटी दिशाभूल केली असेल अशी शंका सुद्धा कोलते यांनी व्यक्त केली .

कार्यवाही करून समिती रद्द करा….

या प्रकरणात आपल्या क्रिड़ा विभागातील वरिस्ठ व दक्ष अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय समिती गठित करून सखोल चौकशी करावी व उपलब्ध पुरावें आणि चौकशी समितीच्या अहवालच्या आधारे या प्रकरणात सहभागी असलेले तालुका क्रिड़ा समितिचे पदस्थ सचिव तथा तालुका क्रिड़ा अधिकारी , क्रिड़ा मार्गदर्शक , अन्य पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्यावर जवाबदारी निश्चित करून या सर्व दोषीना पदाचा दुरुपयोग करने , शासकीय कार्यालयचे नावाचा परस्पर वापर करून ग़ैरप्रकार करने व ग़ैरलाभ घेणे विषयी या सगळ्यांवर शासकीय व प्रशासकीय कार्यवाही करावी, या तालुका क्रिड़ा समितीमधुन त्यानां कायमचे पदमुक्त करण्यात यावे , व पारशिवनी येथील वर्तमान तालुका क्रिड़ा समिति ही त्वरित बर्खास्त / रद्द करून क्रिड़ा विभागातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी व सदस्यांची नव्याने समिती गठित करून तशे जाहिर करावे अशे कोलते यांनी आपल्या लेखी तक्रारमध्ये शासनाला मागणी केली आहे , सोबतच या प्रकरणात कोणतीही कार्यवाहि न केल्यास किंवा करण्यात आलेल्या चौकशी, व कार्यवाहिचा अहवाल किंवा प्रक्रियाशी सहमत किंवा समाधनी नसल्यास सर्व अधिकारी यानां प्रतिवादी करून उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे याचीका दाखल करून दाद मागनार असल्याचे सुद्धा कोलते यांनी आपल्या तक्रारमध्ये नमूद केले आहे .

 

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोजगार मेळा भारताच्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबनाच्या दिशेने मोठे पाऊल - केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांचे प्रतिपादन

Sat Jan 21 , 2023
– केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्र प्रदान नागपूर :-आज नागपूरमध्ये भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्था , भारतीय खाण ब्युरो , आयकर , डाक विभाग, सांख्यिकी विभाग , कर्मचारी भविष्य निधी संघटन , एम्स , कर्मचारी विमा महामंडळ , केंदीय प्रत्यक्ष कर मंडळ या केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com