बदलत्या काळानुसार फॅक्स मशीन झाल्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16:-आजच्या स्पर्धात्मक युगात मोबाईल क्रांती पसरली असून इंटरनेट आणि मोबाईल च्या अतिवापराने अत्यंत महत्वाचा जाणारा फॅक्स मशीन आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.
इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने पाठविलेले संदेशपत्र म्हणजे फॅक्स होय.शासकीय, निमशासकीय कार्यालय, रुग्णालय, व्यावसायिक प्रतिष्ठाने आदी अनेक ठिकाणी महत्वाची माहिती, घटना, तक्रारी,निवेदन, शासकीय दस्तावेज, अपडेट माहिती, सांख्यकीय माहिती किंवा अन्य काही कमी वेळात नियोजित स्थळी पोहोचविण्यासाठी फॅक्स मशीन महत्वाचे साधन होते.फॅक्स विद्दुत संकेताच्या प्रयोगाने कागदपत्रांचे आदान प्रदान करण्याचे काम इलेकट्रोनिक फॉरमेट ने फोटो कॉपी स्वरूपात इंटरनेटच्या मदतीने होत होते.आताच्या मोबाईल टेक्नॉलॉजी प्रमाणे फॅक्स काम करीत होते.या फॅक्स मशीनने जगात कोठेही आपण कागदपत्रे पाठवीत होतो तसेच प्राप्त करीत होतो .पूर्वी तारेचेही महत्व होते.मात्र तार 24 तासात मिळत होती तर फॅक्स काही सेकंदात जात होता .
तार, म्हणजे टेलिग्राम सेवा .मात्र काळाच्या ओघात अत्याधुनिक तंत्रज्ञाना मुळे टेलिग्राम सेवा लोप पावली.मात्र फॅक्स चा उपयोग आताही शासकीय,निमशासकीय कार्यालयात केला जातो.फॅक्स टेलिफोन चेही कार्य करीत होता.फॅक्स कमी वेळात नियोजितस्थळी महत्वाचे कागदपत्रे पाठविण्याचे कार्य करीत असे मात्र याचे कार्य ई मेलवरील रहदारीवर असल्याने त्याला वेळही लागत होता यासाठी खर्चही बराच होता.ज्याला पाठवायचा आहे त्याला मिळाला की दुसऱ्याला,हेही समजत नव्हते .फॅक्स पाठवताना तो बाहेरगावी गेला असेल ,प्रवासात असेल तर फॅक्स मिळू शकत नव्हते.मात्र आता ई मेल वर सांकेताक क्रमांक असल्याने तो त्वरित मिळतो .काही असले तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत आहे.सर्व प्रणाली ऑनलाईन आहे.त्यात फॅक्स आता मागे पडत चालला आहे तरीही अनेक शासकीय,निमशासकिय कार्यालय , दवाखाने आदी ठिकाणी सध्या तरी फॅक्स टिकाव धरून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिवस साजरा

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 16: – आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ , डॉ शबनम खाणुनी यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!