राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी रविवारी (ता. ३०) व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात (स्थायी समिती सभागृहात) महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हुतात्मा स्मारक सुभाष रोड, बालोदयान येथे नगरीतर्फे पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यात आले. तसेच चितार ओळी, जुनी शुक्रवारी, सतरंजीपूरा, गंजीपेठ, सदर चौक स्थित गांधीजींच्या प्रतिमेला महापौर यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी धरमपेठ झोनचे सभापती श्री सुनील हिरणवार, गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, रूपा रॉय, हर्षला साबळे, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, माजी नगरसेवक मनोज साबळे, सहायक आयुक्त महेश धामेचा , सहायक आरोग्य अधिकारी डॉ विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

उद्या पासून ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा उघडणार

Mon Jan 31 , 2022
नागपूर दि. ३१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज आदेश काढत उद्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com