संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- रमजान च्या पवित्र महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवाद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम,त्याग,मनशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करीत असतात त्यामुळे रमजान च्या पवित्र महिन्याला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.तर रमजान चे उपवास म्हणजे रोजा मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात असे मौलिक प्रतिपादन माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी काल दरगाह हजरत बाबा अब्दुल्लाहशाह नौशाही कादरी दरगाह येथे दरगाह ट्रस्ट द्वारा आयोजित दावत -ए-इफ्तार कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रा कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई चे संचालक हुकूमचंद आमधरे, प्रसन्ना तिडके,कांग्रेस कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव,कामठी शहर कांग्रेस कार्याध्यक्ष आबीद ताजी,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,माजी सभापती नीरज लोणारे, माजी नगरसेवक मो अरशद,राजेश गजभिये,राजेंश कांबळे,राजकुमार गेडाम,प्रकाश लाइनपांडे, अभय गेडाम,अन्वर पटेल,आकाश भोकरे,सुमेध गेडाम, अभिजित सीरिया,तौसिफ फैजी,मोहसीन शेख,अय्या ,श्रेयश गजभिये,शाहरुख, वसीम ,दानिश तसेच दरगाह कमिटीचे अध्यक्षआबीद ताजी खालील ताजी, हाजी अनिष शेख इरफान बानी सैय्यद ,अश्फाक कुरेशी,निसार तौसिफ रिजवी,बबलू ,अजीज यासह आबीद ताजी मित्र परिवार आदी उपस्थित होते.