कारखानदारीमुळेच शेतकरी जगेल – माणिकराव ठाकरे

– बोरीच्या सहकारी सूतगिरणीत यंत्रपूजन

– साखर कारखान्यासह सूतगिरणी व डेहनी उपसा सिंचनवर भाष्य

– सार्वजनिक विकासातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल

यवतमाळ :- आपल्या राजकीय जीवनात कधीही प्रसिद्धीचा हव्यास बाळगला नाही. आमदार व राज्यमंत्री असताना दारव्हा मतदारसंघात बोदेगावातील सहकारी साखर कारखाना टिकविण्याचा प्रयत्न केला. बोरीअरब येथे सहकारी सूतगिरणी उभी केली. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून अनेक सिंचन प्रकल्पांसह डेहणी उपसा सिंचन प्रकल्प हाती घेतला. मात्र त्यानंतर हे प्रकल्प राजकीय ईर्षेतून पूर्ण होऊ दिले गेले नाही. उलट बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, लोकविकास करायचा असेल तर, सार्वजनिक विकासावरच भर द्यावा लागेल. कारखानदारीवरच शेतकरी जगेल असे प्रतिपादन काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केले.

आज गुरुवारी बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या यंत्रपूजन व यंत्र उभारणीचा शुभारंभ माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. संजय देशमुख होते. तर अतिथी म्हणून बाळासाहेब मांगूळकर, सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल ठाकरे, नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व सूतगिरणीचे उपाध्यक्ष प्रकाश नवरंगे, शामराव देशमुख, भरत देशमुख तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, तीन गोष्टी विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. त्यामध्ये एक साखर कारखाना होता. बोदेगावचा साखर कारखाना शामराव बापू, माजी आ. हरीष मानधना, बाबूपाटील जैन यांनी उभारला. मात्र तो बंद पडणार असल्याने मी राज्यमंत्री असताना या सर्वांनी हा कारखाना सुरू रहावा म्हणून आग्रह केला. दोन वर्षांपर्यंत पाच लाख मेट्रिक टनापर्यंत या कारखान्याच्या क्रशिंग झाले. मात्र, वारणा समुहाने विरोधकांच्या वारंवारच्या आंदोलनामुळे हा कारखाना सोडून दिला. मी वारणा समुहाला विनंती केली. मात्र, त्यांनी येण्यास नकार दिला. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पासाठी महत्‌ प्रयत्नातून निधी मिळविला. मात्र, हा प्रकल्प शेवटास जाऊ नये म्हणून विरोध केला गेला. मीसुद्धा मंत्री असताना भागाच्या विकासासाठी राजकारण केले नाही. कोणत्याही पक्षाचा आमदार असो, त्याने आपल्या भागाच्या विकासासाठी विरोधाची भूमिका ठेवू नये. मी मंत्री असताना ॲड. शंकरराव राठोड विरोधात होते. मात्र, त्यांच्या संस्था मोडकळीस येईल, असे मी कधीही वागलो नाही. विरोधकांसोबत शत्रूत्वाच्या भावनेने मी वागल्याचे एकही उदाहरण दाखवा असेही ठाकरे म्हणाले.

डेहनी उपसा सिंचनकडे डोळेझाक

बेंबळा धरणावरून डेहणी उपसा सिंचन प्रकल्प निर्माण करण्यासाठी अपर वर्धेचे पाणी कसे टेलद्वारे बेंबळ्यात आणले गेले, ठिबकसाठी 90 टक्के सबसिडीचा शेतकऱ्यांसाठी निर्णय करून घेतला. यवतमाळ व धामणगावकडून दोन्ही बाजुने या प्रकल्पासाठी विजेची सुविधा केली. आदी केलेल्या प्रयत्नांवरही माणिकराव ठाकरे यांनी भाष्य केले. मात्र गेल्या 20 वर्षात डेहणी उपसा सिंचन संदर्भात एकही बैठक आजच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. या योजनेच्या कामाचे श्रेय मला मिळू नये यासाठी प्रयत्न केले. या योजनेचा कंत्राटदार कसा पळून जाईल, यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. विशेष म्हणजे डेहणी उपसा सिंचन प्रकल्पासारखा प्रकल्प संपूर्ण राज्यामध्ये नाही. मात्र आज या प्रकल्पाची सत्ताधाऱ्यांमुळे दुरावस्था झाल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गेल्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

Fri Aug 23 , 2024
यवतमाळ :- गेल्या खरीप हंगामात कापुस व सोयाबीन पिकांचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसला होता. अशा शेतकऱ्यांना भावातील तफावत म्हणून अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!