प्रथम शेतकरी विजयाचा मानकरी पारशीवणी चे रवींद्र भुते,सुधाकर महाजन,हेमराज निंबोने,पवन राऊत,मुकेश खाडे, नत्थू गिरडकर आदी शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पारशीवणी :- नरेंद्र जीनिंग प्रेसिग व भोयर बंधू ट्रेडिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचा खरेदी चा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला मंचकावर प्रामुख्यने अध्यक्ष म्हणून मुरलीधर निंबाळकर,प्रमुख अतिथी माजी मंत्री व काँग्रेस कमिटी चे जिल्हा अधेक्ष राजेंद्र मूळक, जिप.शिक्षण व वित्त विभाग सभापती राजुभाऊ कुसुंबे, तालुका अध्यक्ष दयाराम भोयर, माजी सभापती व नागपूर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस सहकार सेल अशोक चिखले, कस्तुरचंद पालीवाल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबन झाडे, मंसाराम गोंडमारे, नारायण डोईफोडे,प्रकाश डोमकी, चेतन देशमुख,विरू गजभिये,बंटी निंबोने आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चिखले यांनी तर संचालन शिवहरी भड यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते नारळ व पूजा पाठ करून कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या अध्यक्ष भाषणात मुरलीधर निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला ८९२१ रुपये भाव घोषीत केला असून या भावात शासनाने ठरविलेल्या नियमाचे पालन करून शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची भूमिका असल्याचे मत निंबाळकर यांनी व्येत्त केले.याप्रसंगी प्रथम शेतकरी विजयाचा मानकरी पारशीवणी चे रवींद्र भुते,सुधाकर महाजन,हेमराज निंबोने,पवन राऊत,मुकेश खाडे, नत्थू गिरडकर आदी शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक भोयर,इंद्रपाल गोरले,कमलाकर कोठेकर,पुरुषोत्तम जवंजाळ,मंगेश दुंडे, हनवंतराव लकडकर,मोहन राऊत, जिवलग चौहान, घनश्याम टिकमकर,हेमराज दळणे,रोशन महल्ले, चंद्रभान इंगोले,अशोक आमले,गौरव भोयर,गंगाधर काकडे,दीपक वर्मा,प्रेम कूसुंबे, विठ्ठल वडस्कर, ईश्वर थोटे,यादवराव इंगोले,कोमल देवगडे, प्रवीण शेलारे,रवींद्र काळे,गणेश लोणारे,नरेश देवगडे,गजानन महाजन आदींनी अथक परिश्रम घेतले.तर आभार डूमन चकोले यांनी मानले.