यवतमाळ :- केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, भारतीय कृषी अनुसंधान परिषद अटारी, पुणे आणि कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत कळंब तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.सुरेश नेमाडे, प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ मयूर ढोले, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्रज्ञ डॉ. गणेश काळूसे, विषय विशेषज्ञ कृषि अभियांत्रिकी राहुल चव्हाण, कृषि पर्यवेक्षक ईश्वर उत्तमराव, विष्णु गायकवाड, शिवानी बावनकर, गौरव येलकर, अमोल वाळके, प्राची नागोसे, नयन ठाकरे, रविंद्र राठोड, समीर वड्याळकर, सुदर्शन पतंगे, सलमान पठाण, तेजस आंबेकर, राजू शेळके उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये प्रगतिशील शेतकरी वसंतराव इंगोले यांच्या प्रक्षेत्रावर राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत विशेष कापूस प्रकल्पामध्ये अती सघन व सघन लागवड तंत्रज्ञान या विषयावर किसान मेळावा घेण्यात झाला. यावेळी २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश नेमाडे यांनी हवामान बदल, तापमान वाढ व अतिवृष्टी यापासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्याकरीता शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ.प्रमोद मगर यांनी कापसाचे एकात्मिक किड व्यवस्थापण, गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व फवारणी करताना कोणत्या प्रकरची काळजी घ्यावी तसेच निळे व पिवळे चिकट सापळे आणि ट्रायकोकार्ड बद्दल माहिती दिली. सोबतच एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनेचे महत्व सांगितले. प्रगतिशील शेतकरी वसंतराव इंगोले यांनी शेतकऱ्यांना सघन व अती संघन लागवड तंत्रज्ञानबद्दल आपले अनुभव व्यक्त केले. संचलन प्राची नागोसे यांनी केले तर आभार डॉ.काळूसे यांनी मानले. कार्यक्रमानंतर कृषि संवादिनी व बॅग वितरण करण्यात आले.