संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक साँई मंदिरात, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील वाणिज्य विभागाद्वारे वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. सतीश डूडूरे, सहयोगी प्राध्यापिका डॉ. दुर्गा पांडे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बी. एम. तांबे यांना निरोप देण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात साँई मंदिरात पूजाअर्चा करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विधानसभा सदस्य व माजी आमदार आशिष जैसवाल यांनी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष अतिथी डॉ. जयंत रामटेके यांनी डॉ. सतीश डूडूरे यांच्या मार्गदर्शखाली १३ आचार्य पदवी झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले देत त्यांचा व डॉ. दुर्गा पांडे आणि बी. एम. तांबे यांचे शिक्षण क्षेत्र व महाविद्यालयातील सहभाग स्पष्ट केला. इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी डॉ. सतीश डूडूरे यांचे व्यवस्थापन कौशल तर डॉ. दुर्गा पांडे व बी. एम. तांबे यांच्या कर्तव्यनिष्ठ स्वभावाचा उलगडा केला. डॉ. निशिता अंबादे यांनी वाणिज्य विभाग, महाविद्यालय व विद्यापीठात त्यांनी दिलेल्या सेवांची माहिती देतांना गोड-तिखट आठवणींना उजळणी दिली. सेवानिवृत्त प्राध्यापक व सत्कारमूर्ती डॉ. सतीश डूडूरे, यांनी आपल्या सेवाकाळात केलेल्या कामासोबतच आपले अनुभव सांगतांना सर्वांना गोडीगुलाबीने राहण्याचा सल्ला दिला. सेवानिवृत्त प्राध्यापक व सत्कारमूर्ती डॉ. दुर्गा पांडे यांनी पोरवाल परिवारातून जात असतांना आपण सुखद आठवणीचा खजिना घेवून जात असल्याचे विचार मनोगतात व्यक्त केले. वाणिज्य विभाग प्रमुख व कार्यक्रम अध्यक्ष डॉ. इफ्तेखार हुसैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश डूडूरे, डॉ. दुर्गा पांडे व बी. एम. तांबे यांनी विभाग आणि महाविद्यालयाला दिलेल्या सेवांची जंत्री देतांना आता त्यांच्या सेवांची उणीव सदैव भासेल असे मत मांडले. याप्रसंगी डॉ. दिपक भावसागर, डॉ. प्रशांत धोंगळे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. अलोक रॉय, डॉ. राजेश पराते, डॉ. किशोर ढोले, डॉ. महेश जोगी, डॉ. विकास कामडी, डॉ. जयश्री ठवरे, रेमेश पालीवाल, श्याम बारापापत्रे, सीमा पाटील सहित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समापन सत्कार्मुर्तींना भेटवस्तू देवून भोजनादानाने करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन डॉ. तारुण्य मुलतानी तर आभार कँप्टन मोहम्मद असरार यांनी मानले.