संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया असे एकुण २९४ नागरिकांना लाभ.
कन्हान : – जवाहरलाल नेहरू हाॅस्पील कांद्री येथे वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया असे एकुण २९४ नागरिकांना लाभ देत थाटात संपन्न झाले.
शुक्रवार (दि.५) ऑगस्ट ला वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने कांद्री जे एन हाॅस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबी राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गुप्ता यांच्या हस्ते वे को लि फलकावर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून महात्मे आय बँक, आय हॉस्पिटल चे डॉक्टर व चंमुचे पुष्पगुच्छाने स्वागत करून शिबीराची सुरूवात कर ण्यात आली. या मोफत नेत्र तपासणी शिबीरात १९६ नागरिकांनी तपासणी केली असुन ९७ नागरिकींची मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली. असे एकुण २९४ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी मान्यवरांनी नेत्र आजाराचे उपचारा व काळजी विषयी मार्गदर्शन करून शिबीर थाटात संपन्न करण्यात आले. शिबीराच्या यशस्वितेकरिता डॉ दीपावासे, डॉ देवघळे, डॉ भीझनेश्वर प्रसाद, डॉ नेहा खोब्रागडे, डॉ व्दिवेदी, डॉ श्रीवास्तव सह जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल कांद्री चे डॉक्टर, नर्स व कर्मचा-यांनी सहकार्य केले.