Ø शाळा प्रमुखांना 19 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरता येणार
नागपूर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे शाळा प्रमुखांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रद्धतीने भरण्यास 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत विलंब शुल्कासहित आवेदनपत्र भरता येणार आहेत.
माध्यमिक शाळांनी नियमीत विद्यार्थ्यांच्या परिक्षेची आवेदनपत्रे सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यासह पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsseboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरावयाची होती. आता यास 6 ते 19 नोव्हेंबर 2024 दरम्यान नियमित शुल्कासह आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह आवेदन 20 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान करता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.