यवतमाळ :- व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून प्रवेशासाठी दि.30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यात मुली व मुलांचे प्रत्येकी ९ असे एकूण १८ शासकीय वसतीगृहे कार्यरत आहे. व्यवसायिक पाठ्यक्रमात प्रथम वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी ऑनलाईन आज्ञावली विकसित करण्यात आलेली असून महाआयटीने विकसित केलेल्या http://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे दि. ३० ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेश अर्ज संबंधित शासकीय वसतीगृहाकडे सादर केले असतील त्यांनी सुध्दा ऑनलाईन अर्ज परिपूर्ण भरुन त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित शासकीय वसतीगृहाकडे सादर करावी. जे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करणार नाही, त्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह निवडीसाठी पात्र धरण्यात येणार नाही तसेच मुदतीनंतर कुठल्याही प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.