नागपूर : विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आली असून अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुली प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. 2022-23 या शैक्षणिक सत्रात स्वाधार योजनेचे अर्ज सुरु करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी 1 मार्चपर्यंत समाज कल्याण सहायक आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
खाते क्रमांक सादर केलेल्या प्रथम वर्षाकरीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी तेच खाते क्रमांक दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळण्याकरीता सादर करावे. खाते क्रमांक मध्ये बदल केल्यास स्वाधार योजनेची रक्कम आपल्या खात्यात जमा न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष
विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रर्वगाचा असावा. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी, 1 मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, दीक्षाभूमी रोड, श्रध्दानंदपेठ नागपूर येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर येथे संपर्क साधावा.
@ फाईल फोटो