यवतमाळ :- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत तुर खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत जिल्ह्यात 10 खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील तुर खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि. 24 फेब्रुवारी पासुन पुढे 30 दिवसांपर्यंत करण्यात येणार होती. शासनाकडून त्यास अजून 15 दिवसांपर्यत मुदतवाढ दिली आहे. प्रत्यक्षात आता तुर खरेदी दिनांक 13 मे पर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिक पेरा व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून तुर खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.
जिल्ह्यात तुर खरेदीसाठी तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, तालूका खरेदी विक्री समिती दिग्रस, कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव, शेतकरी कृषि खाजगी बाजार दत्तरामपुर आर्णी, किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा, अग्रोव्हील फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. कोंघारा, मोहदा, मोतीबाग फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. लाखखिंड, नेर या केंद्रांचा समावेश आहे.