-लोकनाथ स्वामी महाराज यांच्या हस्ते तुमसर किचनचे उद्घाटन
नागपूर :-आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) चे संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे प्रिय शिष्य आणि महाराष्ट्र व नोएडाचे विभागीय सचिव श्रील लोकनाथ स्वामी महाराज यांच्या हस्ते अन्नामृत फाऊंडेशन नागपूरचा विस्तार रुपातील तुमसर सेंट्रलाइज्ड किचनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यूयॉर्क अमेरिकेतील श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज विशेषत्वाने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उद्योगपती नीता पित्ते आणि विवेक पित्ते होते. सेंट्रलाइज्ड किचनच्या संपूर्ण बांधकामाचा भार गोविंदम फाऊंडेशन हॉस्पेट कर्नाटकच्या अंजू सराफ व अजय सराफ यांनी स्व. स्वर्णलता सराफ आणि कै. गोविंददास सराफ यांच्या स्मरणार्थ स्वीकारला आहे.
सविस्तर माहिती देताना अन्नामृत फाउंडेशन, नागपूरचे अध्यक्ष डॉ. श्यामसुंदर शर्मा म्हणाले की, ज्या दहा हजार चौरस फूट जागेवर किचनचे बांधकाम करण्यात आले आहे, ती जागा तुमसरचे चार्टर्ड अकाउंटंट अनिल सराफ यांनी त्यांचे माता-पिता शकुंतला देवी सराफ आणि डोंगरदास सराफ यांच्याद्वारे दान देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात वास्तुशांती यज्ञाने झाली. डॉ.श्यामसुंदर शर्मा व सौ.शकुंतला शर्मा उर्फ शुभांगी माताजी हे यावेळी प्रमुख यजमान होते. इस्कॉन चौपाटीचे मुरलीधर प्रभू, इस्कॉन पंढरपूर गुरुकुलचे प्रमुख आचार्य जगन्नाथ कृपा प्रभू आणि गुरुकुलचे विद्यार्थी भक्त दामोदर आणि भक्त आर्य यांचा यज्ञ करणाऱ्या आचार्यांमध्ये समावेश हेाता. अतिशय सुंदर आणि कर्णप्रिय वैदिक मंत्रांच्या माध्यमातून त्यांनी पूजा आणि हवनाचे विधी पार पाडले. हवनाची पूर्णाहुती प्रमुख यजमान राजेंद्रन रमण (व्यवस्थापक), भगीरथ दास (संचालक), लोकनाथ स्वामी महाराज यांच्यासह इतर प्रमुख व विशेष पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विशाल प्रभू आणि सुदामा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे या महामंत्राचा जयघोष करण्यात आला.
या कीर्तनासोबतच गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या वेदमंत्रांच्या गजरात लोकनाथ स्वामी महाराज आणि इतर पाहुण्यांनी किचनच्या ईशान्य दरवाजाची पूजा करून नवीन वास्तूगृहात प्रवेश केला आणि त्याचे औपचारिक उद्घाटन केले. त्यानंतर महाराज आणि पाहुण्यांनी भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा महाराणी या तिन्ही मूर्तींना अभिषेक केला.
अभिषेकानंतर झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जिगिषा नायडू यांनी केले. लोकनाथ स्वामी महाराजांनी प्रमुख पाहुणे नीता आणि विवेक पित्ते, अंजू आणि अजय सराफ, सीए अनिल सराफ यांचा पुष्पहार व विशेष भेट देऊन सत्कार केला. अन्नामृत फाउंडेशनचे संचालक राजेंद्रन रमण आणि प्रवीण साहनी यांनी महाराजांना या कार्यात साथ दिली.
अन्नामृत फाउंडेशनचे उपाध्यक्ष दिल्लीचे रहिवासी संजय टिकू उर्फ सर्वदर्शी प्रभू, पेन इंडिया शेअर अवर स्ट्रेंथचे प्रमुख समीर बेंद्रे, आणि प्रकल्प प्रमुख सचिन जहागीरदार, अण्णामृत फाउंडेशन, छत्रपती संभाजी नगर शाखेचे प्रमुख सुदर्शन प्रभू, अन्नामृत फाउंडेशन जालनाचे शाखाप्रमुख गणेश नकाते, इस्कॉन नागपूर व वल्लभविद्या नगर गुजरातचे अध्यक्ष सच्चिदानंद प्रभू, इस्कॉनचे विभागीय सचिव द्वय हरी कीर्तन प्रभू आणि अनंतशेष प्रभू, प्रो. डॉ. निमदेवकर, दिनेश अग्रवाल (नागपोते), अरुण अग्रवाल, वास्तुशास्त्री सत्यनारायण शर्मा आदी विशेष अतिथींचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात 250 हून अधिक इस्कॉन भक्त सहभागी झाले होते. व्रजेंद्र तनय प्रभू, उपाध्यक्ष, इस्कॉन, नागपूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक भाविक तीन बसेस आणि त्यांच्या वैयक्तिक गाड्यांमधून कार्यक्रमस्थळी पोहोचले.
लोकनाथ स्वामी
लोकनाथ स्वामी महाराजांनी आपल्या भाषणात जीवनासाठी अन्नाचे महत्त्व सांगितले आणि दोन मुलांना भाकरीसाठी कुत्र्यांशी भांडताना पाहून ही योजना श्रील प्रभुपादांनी सुरू केल्याचेही सविस्तर सांगितले. अन्नामृत फाउंडेशन या फूड फॉर लाइफ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. शेवटी राजेंद्रन रमण आणि डॉ.श्यामसुंदर शर्मा यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
डॉ. श्यामसुंदर शर्मा
अध्यक्ष, अन्नामृत फाउंडेशन
नागपूर