नागपूर :- वस्तू व सेवाकर विभागाने अभय योजना-2022 जाहीर केली असून राज्यातील व्यावसायिकांकडून योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सप्टेंबर अखेर जवळपास 1 लक्ष 20 हजार प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांनी रकमेचा भरणा केला असून 1 लक्ष 12 हजारपेक्षा अधिक अर्ज यापूर्वीच विभागाला प्राप्त झाले आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास 14 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्यकर सहआयुक्त डॉ. संजय कंधारे यांनी कळविले आहे.
शेवटचा आठवडा उरला असल्याने व्यापाऱ्यांनी विहित मर्यादेत अर्ज सादर करावा. या नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.