नागपूर :- यवतमाळ येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित १५व्या अ.भा. आंबेडकर साहित्य संमेलनातील कलादालनात वैदर्भीय कला अकादमीचे सचिव नानू नेवरे यांचे ‘माझा शेतकरी’ छायाचित्रकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘हवालदिल शेतकरी व आत्महत्या’ या विषयावर हे छायाचित्र प्रदर्शन राहणार आहे.
नानू नेवरे हे अनेक वर्षांपासून नागपुरात छायाचित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत व प्रखर सामाजिक भान असलेले छायाचित्रकार आहेत. अनेक प्रसंगांची छायाचित्रे त्यांनी एखाद्या चित्रकाराप्रमाणे आमच्या कॅमेऱ्याने सजीव केली आहेत. राजकारण, समाजकारण, कला अशा अनेक क्षेत्रातील त्यांच्या छायाचित्रांनी जाणकार, सामान्य रसिकांची दाद मिळविली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनातील व्यथावेदनांचे चित्रण व कलात्मक दर्शन घडविणारी त्यांची छायाचित्रमालिका चांगलीच गाजली आहे. त्यांच्या चित्रमालिकेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन ‘माझा शेतकरी’ या शीर्षकांतर्गत यवतमाळ येथे बघायला मिळणार आहे. नुकतेच विद्रोही साहित्य संमेलनात या छायाचित्रमालिकेने रसिकांचे लक्ष वेधले होते.