पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूची उत्कृष्ट कामगिरी

-पदक तालिकेत विद्यापीठ चौथ्या स्थानावर 

नागपूर :- गणपत विद्यापीठ गुजरात येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकूण पदक तालिकेत विद्यापीठाची चमू चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. विद्यापीठातील २३ कलावंत विद्यार्थी तसेच संघ व्यवस्थापक यांची राष्ट्रीय युवा महोत्सवाकरिता निवड झाली आहे.

गणपती विद्यापीठ मेहसाणा गुजरात येथे १० ते १४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान भारतीय विद्यापीठ संघ द्वारा आयोजित पश्चिम विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यापीठाची चमू उत्कृष्ट कामगिरी करीत एकूण पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चमूतील सुगम संगीत प्रकारात प्रतीक म्हैसकर यांनी तृतीय पुरस्कार पटकाविला. तालवाद्य प्रकारात विपुल ढोले यांनी तृतीय पुरस्कार, ड्रामा प्रहसन प्रकारात संघाने द्वितीय पुरस्कार पटकावला. यामध्ये प्रणव धनुष्कर, सिद्धांत क्षीरसागर, नितीन मरसकोल्हे, गौरी दुर्गे, निरजा चोपडा, आश्लेषा डोंगरदिवे यांचा समावेश होता. निर्देशक जय गाला व सारंग गुप्ता यांनी केले. मिमिक्री प्रकारात ब्रायन डोंगरदिवे यांनी तृतीय पुरस्कार पटकावला. फाईन आर्ट पोस्टर मेकिंग प्रकारात सपना दहीकर हिने तृतीय पुरस्कार तर फोटोग्राफीमध्ये नम्रता भारती तिने तृतीय पुरस्कार पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत विशाल खर्चवाल याने प्रथम पुरस्कार तर वादविवाद स्पर्धेत विशाल खर्चवाल व मेहेंदी शेख यांनी प्रथम पुरस्कार पटकावला. शास्त्रीय नृत्य प्रकारात कामाक्षी हम्पीहोळी यांनी प्रथम पुरस्कार पटकावित पथकांमध्ये भरक टाकली. विजेत्या स्पर्धकांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सायक्लोथॉनच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह स्वच्छतेचा जागर

Thu Feb 16 , 2023
स्मार्ट सिटीच्या अभिनव ‘फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा जागर करीत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित सायक्लोथॉनला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. सकाळी ६.३० वाजता नागरिकांनी सायकल रॅलीत भाग घेऊन पर्यावरणचा संरक्षण आणि नागपूरला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ करण्याचा निर्धार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com