कामठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभाग नोंदवावा-माजी जी प सदस्य अनिल निधान.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 10 :- स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान पथ,पक्ष धर्मविरहित असून देशाप्रती कामठी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील , प्रत्येक समाजास जागृत करणे तथापि प्रत्येक घरावर तिरंगा फळकवलाच पाहिजे यासाठी सर्व पदाधिकारि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी आज कामठी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित सभेत व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत देशातल्या प्रत्येक घरावर दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशासाठी बलिदान केलेल्या वीर हुतात्म्याला अभिवादन करावे याकरिता आज भारतीय जनता पार्टी कामठी तालुका ग्रामीण च्या वतीने भाजप कार्यालय कामठी येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत माजी जी प सदस्य अनिल निधान बोलत होते .बैठकीला प्रामुख्याने भाजप तालुका अध्यक्ष किशोर बेले, महिला आघाडी अध्यक्ष मंगला  कारेमोरे ,येरखेडा महिला अध्यक्ष सरिता भोयर, कोराडी जिल्हा परिषद प्रमुख किशोर बर्डे कवठा पंचायत समिती प्रमुख धनंजय इंगोले ,तालुका महामंत्री उमेश महल्ले, युवा मोर्चा महामंत्री लोकेश माळोदे ,विश्वनाथ चव्हाण ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किरण राऊत , ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल बोढारे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मनीष मेश्राम ,नितेश दुर्वे, गोलू वानखेडे,तालुका महामंत्री लीलाधर काळे, विशाल चामट, फुलचंद आंबीलडूके आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जयस्तंभ चौकात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला..

Wed Aug 10 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील एका कुलूपबंद पांनठेल्याजवळ एक 65 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल सायंकाळी साडे पाच दरम्यान निदर्शनास आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले आहे.मृतक पाच फूट उंचीचा असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com