सिमेंटच्या झाला गोटा तरी शाळेतील शौचालयाचे बांधकामाला सुरुवात नाही – अडेगाव सरपंचा मंदा राखडे 

कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या गट ग्रामपंचायत अडेगाव येथे शाळेतील शौचालयाचे मंजूर काम करण्यासाठी मागील चार महिन्यापूर्वी पासून आणलेला सिमेंटच्या 70 ( सत्तर)बॅगा चे रूपांतर शाळेच्या एका बंद खोलीत ठेवल्या ठेवल्या गोट्यामध्ये झालेले आहे, तर कृत्रिम स्लॅब चे पत्रे शाळेतील संरक्षण भिंतीच्या व आडेगाव ते कांद्री रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेले आहे. मात्र अजूनही ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही.

याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असलेल्या सरपंच व इतर उपस्थित सदस्यांसह सचिव जयेंद्र सोलंकी यांना ठेकेदार कोण आहेत ?याबाबत विचारपूस केली असता ठेकेदाराचे नाव आम्हाला माहित नाही, असे सांगितले. 70 बॅग सिमेंट ला शाळेच्या एका बंद इमारतीत गोटा करणारा तो करोडपती ठेकेदार कोण ?असा सवाल अडेगाव सरपंच , सदस्यांसह ग्रामस्थांनी शिक्षण विभागासमोर मांडला असून त्या करोडपती ठेकेदाराला शोधून शाळेतील शौचालयाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी अडेगाव येथील शाळेत शिकणारे विद्यार्थी, त्यांचे पालक व सरपंच मंदा राखडे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयातील 9 आरोग्य संस्थाना पुरस्कार

Wed Oct 2 , 2024
गडचिरोली :- कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयात एकूण 9 आरोग्य संस्थाना राज्यस्तरावरुन पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. यात रु.50 हजार ते 3 लाखापर्यंत असे एकूण 10 लाख रुपयांचे पुरस्कार जिल्ह्याला मिळाले आहे. कायाकल्प कार्यक्रमातुन आरोग्य केंद्राचे बळकटीकरण व सेवांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले. केंद्र शासनाने शासकिय रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com