नागपूर :-सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, असे शाळा महाविद्यालयातून शिकविले जाते. मात्र हा सिद्धांत उचित नसून त्याने कलिंग युद्धापूर्वीच बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक भि. म. कौसल यांनी आज येथे केले.
बहुजन समाज पक्षातर्फे सम्राट अशोकाची 2327 वी जयंती येथील संविधान चौकात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की याबाबतचे अनेक साहित्यिक व पुरातात्विक पुरावे उपलब्ध झाल्याने याविषयाची पुष्टी करता येते.
आपला मुद्दा स्पष्ट करताना भिक्खू महेंद्र कौसल म्हणाले की जर अशोक कलिंग युद्धापूर्वीच बौद्ध बनला होता तर त्याने हे युद्ध का केले? असा प्रश्न विचारला जातो. अशोकाने हे युद्ध साम्राज्य विस्तारासाठी नव्हेतर आपल्या साम्राज्याचे संरक्षण व हिताची काळजी घेण्यासाठी केले होते. याबाबतचे उल्लेख त्याच्या अभिलेखात आढळतात असेही कौसल यांनी सांगितले. बुद्धाने देखील साम्राज्याच्या संरक्षणाचा विचार करुन सैनिकांना धम्म दीक्षा देणे थांबविले होते असे शेवटी ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव राजीव भांगे, रंजना ढोरे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रा सुनील कोचे, जिल्हा सचिव डॉ शितल नाईक, शहर प्रभारी विकास नारायणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांनी तर समारोप जिल्हा सचिव अभिलेख वाहने यांनी केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, माजी शहराध्यक्ष महेश सहारे, योगेश लांजेवार, प्रवीण पाटील, मनोज गजभिये, प्रा करुणा मेश्राम, युवा नेते सदानंद जामगडे, चंद्रशेखर कांबळे, नितीन वंजारी, बुद्धम राऊत, ऍड वीरेश वरखडे, वीरेंद्र कापसे, प्रकाश फुले, सुरेंद्र डोंगरे, ऍड अतुल पाटील, भानुदास ढोरे, एन आर उके, जितेंद्र पाटील, नरेश मेश्राम, प्रा जगदीश गेडाम, सावलदास गजभिये, सुनील धुल, आशिष आवडे, जनार्दन मेंढे, तपेश पाटील, लक्ष्मण वाळके, संदेश कांबळे, रमेश वंजारी, अभय डोंगरे, ईश्वर कांबळे, अनिल मेश्राम आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.