आदिवासी समाजातील विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित

भंडारा :- 9 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी दिनानिमित्त 13 ऑगस्ट 2023 रोजी आदिवासी विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.सदर स्पर्धा दोन गटात विभागली असून पहिला गट इयत्ता 1 ली ते 10 वी,दुसरा गट इयत्ता 10 वी पुढील विद्यार्थी अशा दोन गटात आयोजित करण्यात येणार आहे.सदर निबंध स्पर्धा प्रत्येक तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे.

ज्या ज्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्यांचे तालुका स्तरावर उपस्थित राहावे,तसेच परिक्षेला येतांना विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याबाबत बोनाफाईट तसेच जातीचा पुरावा सेाबत आणावे,व विद्यार्थ्यांनी नमुद परिक्षा केंद्रावर थेट प्रवेश दिल्या जाईल.

सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्र,व नगर परिषद,गांधी विद्यालय भंडारा,व साकोली-नंदलाल पाटील कापगते महाविद्यालय साकोली, तसेच तुमसर-नगर परिषद, नेहरु विद्यालय तुमसर, मोहाडी-जिल्हा परिषद, कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी, लाखनी-जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, पवनी-नगर परिषद, विद्यालय पवनी,लाखांदुर-जिल्हा परिषद, हायस्कुल लाखांदुर असे असतील.तरी स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विषय राहतील,यांची संबंधितानी नोंद घ्यावी,

स्पर्धेचे विषय गट पहिला-1ली ते 10 वी-महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे थोरपुरुष व क्रांतीवीर यांचे जीवनचरित्र तसेच गट दुसरा-10 वी च्या पुढील आदिवासी समाजाच्या जडणघडणात आदिवासी युवकांची भुमिका.

स्पर्धेतील दोन्ही गटातील उत्कृष्ठ तीन निबंधाना आकर्षक पारितोषिक दिले जाईल.यासाठी अटी व शर्ती सादर करण्यात येत आहे.1 विद्यार्थी स्तर 2023-24 मध्ये भंडारा जिल्हयातील शाळा व महाविद्यालयात प्रवेशीत असावा,तसेच 2 विद्यार्थी आदिवासी समाजाचा असावा,यांची जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे निरज मोरे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पिपरा उपकेंद्राचे ' आरोग्य ' बिघडले !

Tue Aug 8 , 2023
– डॉक्टर गेले कोर्टात : रुग्णसेवा झाली रामभरोसे बेला :- जवळच्या पिपरा येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या एक महिन्यापासून डॉक्टर नसल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे .जलजन्य व साथ रोगाचा सध्या प्रादुर्भाव सुरू आहे . डोळ्यांचा आजार सुद्धा बळावला आहे. मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घेणे भाग पडत आहे. चार हजार लोकसंख्येचे गाव असल्याने येथे एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!