पिपरा उपकेंद्राचे ‘ आरोग्य ‘ बिघडले !

– डॉक्टर गेले कोर्टात : रुग्णसेवा झाली रामभरोसे

बेला :- जवळच्या पिपरा येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या एक महिन्यापासून डॉक्टर नसल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे .जलजन्य व साथ रोगाचा सध्या प्रादुर्भाव सुरू आहे . डोळ्यांचा आजार सुद्धा बळावला आहे. मात्र डॉक्टर नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांकडे जाऊन महागडे उपचार घेणे भाग पडत आहे.

चार हजार लोकसंख्येचे गाव असल्याने येथे एक सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका यांची नियुक्ती मंजूर आहे. परंतु सद्यस्थिती तिन्ही जागा रिक्त आहे. बेला प्राथमिक आरोग्य केंद्रातील आष्टा येथील दवाखान्याचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कडू यांचेकडे सध्या सिरसी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त प्रभार आहे. पिपरा उपकेंद्रातून डॉ. डोंगरवार यांची बदली झाली. त्यांचे जागी कामठी येथून चंद्रपाणी गणवीर येणार होते. पण बदलीच्या आदेशापूर्वीच ते कोर्टात गेले. त्यामुळे पिपरा येथील डॉक्टरांचे पद रिक्त आहे. असे डॉ. कडू यांनी सांगितले. डॉक्टर रुजू न झाल्यामुळे पिपरा आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद सदृश्य अवस्थेत दिसते. या भानगडीत अनियमित व उदासीनपणामुळे येथील ओपीडी रुग्णसंख्या दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे.

प्रतिक्रिया –

‘ रामभरोसे चालणाऱ्या या आरोग्य उपकेंद्राकडे तातडीने लक्ष द्यावे व दोन्ही डॉक्टर देऊन आरोग्य सेवा व व्यवस्था नियमित सुरू करावी. अशी मागणी मी जिल्हा आरोग्य अधिकारी व उमरेड पंचायत समिती यांच्याकडे केली आहे.’

प्रशांत पाहुणे सरपंच, ग्रामपंचायत पिपरा

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रावण सोमवारची कथा पाठ केल्यास सर्व दुःखांचा अंत होतो - अनंतलाल यादव

Tue Aug 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी व्रत ठेवून श्रावण सोमवारची कथा पाठ केल्यास सर्व दुःखांचा अंत होतो आणि भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मौलिक प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अनंतलाल यादव यांनी श्रावण सोमवार निमित्त आयोजित सामूहिक पूजा प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर चे पुजारी महेश यादव, जयपाल यादव , कल्लू यादव , रामनाथ यादव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com