ईपीएस 95 पेन्शनवाढीसाठी विधिमंडळावर मोर्चा नेणार

नागपूर: ईपीस-95 योजनेअंतर्गत मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मोर्चा काढण्याची घोषणा ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी आज केली.

समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या पेन्शनर मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर अध्यक्षस्थानी होते.

ईपीएस पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच जो निकाल दिला त्यामुळे 1-9-2014 पर्यंत निवृत्त झालेल्या सर्वांना पेन्शन मिळेलच. पण त्यानंतर सेवेत लागलेल्यांनाही पेन्शन लागू राहील, असा खुलासा करून समन्वय समितीचे राष्ट्रीय सल्लागार दादा झोडे यांनी या निकालाबाबतचा संभ्रम दूर केला.

कोश्यारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सरचिटणीस अँड.अविनाश तेलंग यांनी यावेळी केले.

संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि सरकारला जाग येणार नाही, असा इशारा समन्वय समितीचे नागपूर अध्यक्ष श्याम देशमुख यांनी दिला. मेळाव्याचे संयोजक पत्रकार विनोद देशमुख यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिवाळी अधिवेशन विशेष..

Thu Dec 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  शासनाची ‘सन 2022’पर्यंत सर्वांसाठी घरे संकल्पना धुळीस -मागील पाच वर्षात फक्त 276 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 -प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासीयांचे घरकुल योजनेचे स्वप्न भंगलेhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 कामठी ता प्र 15 :- ‘रोटी कपडा और मकान’या त्रिसूत्री कार्यक्रमातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणारा भाग म्हणजे निवारा. तेव्हा बेघर असलेल्या नागरिकांसाठी कामठी नगर परिषद च्या वतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून इंदिरा आवास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com