दीड दिवसांच्या २६९ श्रीगणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

चंद्रपूर :- श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तिमय वातावरणात आणि शांततेत बाप्पांच्या आगमनानंतर बुधवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या २६९ गणपती मूर्तींचे विसर्जन झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध ठिकाणी लावलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्तींचे विसर्जन पार पडले.

झोन क्र. १ (अ ) अंतर्गत १०, झोन क्र. १ (ब ) अंतर्गत २१, झोन क्रमांक २ (अ ) अंतर्गत – ७०, झोन क्रमांक २ (ब ) – ४६, झोन क्र. ३ (अ) – ५८, झोन क्रमांक ३ (ब ) येथे – ६४ अश्या दीड दिवसाच्या एकुण २६९ श्रीगणेश मुर्तींचे विसर्जन शहरात झाले. यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही. शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. याकरीता २५ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे.

विसर्जन आपल्या दारी ’ उपक्रमांतर्गत घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यास झोननिहाय ३ ‘ फिरत्या विसर्जन कुंडांची ‘ व्यवस्था करण्यात आली असुन नागरीक उत्स्फूर्तपणे गणेशमूर्तींचे विसर्जन येथे करत आहेत. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक व संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आपल्या परिसरातील विसर्जन रथाची माहिती घेण्याकरिता पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

◆संपर्क क्रमांक◆

● झोन १ – ९८८१५९०४०२,९०११०१८६५२

● झोन २- ८८०६५१५४८३,९०११०१८६५२

● झोन ३ -९०७५९२५३१०,९०११०१८६५२

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : पीओपी मुर्ती विक्रेत्यांवर कारवाई

Thu Sep 21 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.20) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सानु मुर्ती भंडार, हुडकेश्वर रोड, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच श्याम भोयर, छोटा ताजबाग रोड, नागपूर यांच्यावर फूटपाथवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!