संदीप कांबळ विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 3 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रहिवासी व नागपूर च्या खापरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी गौरव राघोर्ते नामक तरुणाचा नागपूर वर्धा रोड वरील एअर फोर्स ऑफिसर्स मेस जवळ काल दुपारी दीड वाजेदरम्यान कार अपघातात जागीच मृत्यु झाला तर सहपाठी असलेले चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून जखमी मध्ये दिवेश निघोट, वेदांत उदापुरे,तन्मय मेगांगले, अमन यादव सर्व रा नागपूर चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व सहपाठी जखमी विद्यार्थी हे काल अभियांत्रिकी विषयाचा पेपर देऊन कार क्र एम एच 49 ए एस 3603 ने फिरायला जात असता सदर घटनास्थळी कार अपघातात गौरव राघोर्ते नामक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले .
घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाच्या पार्थिवावर नागपूर च्या मेडिकल रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.तर या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.मृतकाच्या पाठीमागे आई वडील व एक लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.