चंद्रमणी नगरातील चंद्रमणी बुद्ध विहारात वर्षावास समापन 

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु पूज्य चंद्रमणी महाथेरो यांच्या नावावर असलेल्या चंद्रमणी नगरातील बुद्ध विहारात आज वर्षावास समापन प्रसंगी भिक्खूंना भोजनदान, संघदान व धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे विदर्भातील प्रमुख भन्ते प्रियदर्शी महाथेरो, न्यू कैलाश नगरातील कुशीनारा बुद्ध विहाराचे व्यवस्थापक भन्ते डॉ. धम्मोदय, चंद्रमणी नगर बुद्ध विहाराचे अध्यक्ष नागोराव जयकर, जय भीम को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विनोद धनविजय, पत्रकार संतोष तायडे, अजनी पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे, बसपा नेते उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी भन्ते ग्यानबोधी, भन्ते विनयकीर्ती, भन्ते सुमंगल, भन्ते कात्यायनबोधी, भन्ते तीस्समित्र, भन्ते प्रज्ञाविर, भंते प्रज्ञावंश, भन्ते डी संघानंद, भंते धम्मपाल, भन्ते सुमन, भन्ते महाकश्यप, भन्ते धम्मज्योती, भन्ते प्रज्ञाप्रिय आदी पूज्य भिक्खुंना आयोजकांच्या वतीने भोजनदान व संघदान करण्यात आले.

याप्रसंगी परिसरातील मनोहर नंदेश्वर, प्रदीप ढोबळे, मधुकर लिंगायत, वसंता चारबे, अशोक गवळी, मोहन वाळके, संजय नगरारे, विजय कस्तुरे, राहुल ढोले, प्रमोद कस्तुरे, ईश्वर कोमलकर, माया कांबळे, सुनिता डंबारे, संघमित्रा वानखेडे, छाया मानकर, करुणा गवळी, माया गायकवाड, चंद्रकला कांबळे, वसला शंभरकर, अहिल्या नंदेश्वर आदी सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'वेध ' प्रतिष्ठान ने दिया निराधार वृद्धो को मदत का हात

Fri Oct 28 , 2022
व्यंकटेश वृद्धाश्रम माहुली मे वेध प्रतिष्ठान की ओर से दिपोत्सव, दिपावली मिलन समारोह मनाया गया. पारशिवनी :- ‘वेध’ प्रतिष्ठान नागपुर, ब्दारा जो मानवीय मूल्यों के साथ समग्र विकास की दृष्टि से छात्रों, शिक्षकों और समाज के लिए काम करता है, ऐसे दिवाली के अवसर पर पारशिवनी तालुका के माहुली गांव में वेंकटेश वृद्धाश्रम में वेध प्रतिष्ठान व्दारा  गद्दे, तकिए और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com