-105 कामावर 3528 मजूर
कामठी ता प्र 23:-कामठी तालुक्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी मजूर प्रधान(अकुशल)कामांना सुरुवात केली असून 44 अंश तापमानातही सिंचन विहीर 9, घरकुल 27 , पांदण रस्ता 1 , वृक्ष लागवड 66 , रोपवाटिका 1, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड 1 असे एकूण 105 कामावर 3 हजार 528 मजूर कार्यरत आहेत.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्यरेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करण्याच्या उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरुवात केली आहे.ती राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असून यात 60 टक्के अकुशल(मजूर प्रधान)व 40 टक्के कुशल कामांचे(बांधकाम)प्रयोजन करण्यात आले आहे.नुकतेच 19 मे च्या ग्रामसेवकांच्या सभेत पंचायत समिती प्रशासनाने कामठी तालुक्यात मंजूर कामांची लाभार्थी निहाय व ग्रामपंचायत निहाय यादी वाचन करून कामे तात्काळ सुरु करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
कामठी तालुक्यात मजुरांना रोजगार उपलब्ध
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com