18 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे , धाडसत्र राबवून 21 बालकामगारानां केले मुक्त

गडचिरोली :- जी मुले स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार, कमवितात त्यांना बलकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात जाडु घेउन साफ सफाई करायची, भांडी कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात.बालमजुरीची अनिष्ठ प्रथा नष्ठ करून बालकामगार मुक्त करणे हे शासनाचे उदीष्ट आहे. बाल आणि किशोर कामगार प्रतिबंध अनिनियम 1986 आणि सुधारीत 2016 नुसार व बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनिम 2016 व सुधारित अधिनीयम 2021 या कायदयाअनव्ये 18 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे गुन्हा आहे.

त्यामध्ये हॉटेल, धाबे, बांधकाम विधि दुकाने, आदी व्यवसायांचा समावेश आहे. जागतीक बाल कामगार विरोधी दिवसानिमीत्य जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली व स्पर्श संस्था गडचिरोली अंतर्गत कैलास सत्यार्थी चिल्हॅन फांउडेशन एक्सेस टु जस्टीस प्रकल्प व चॉईल्ड लाईन व पोलिस प्रशाननाच्या सहकार्याने गडचिरोली शहरात 18 वर्षाखालील बालक विविध हॉटेल्स, मध्ये काम करतात त्या ठिकाणी धाळमोहिम राबविण्यात आली सर्वप्रथम  दिनांक 12 जुन ला जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ओंकार पवार परिविक्षाधिन अधिकारी भारतीय प्रशासन सेवा, (IAS) जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या हस्ते सदर बाल कामगार शोधमोहित राबविण्याकरिता हिरवी झेंडी दाखवून शुभांरभ करण्यात आले. यावेळी उपस्थित मा. समाधान शेंडगे निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, बाल कल्याण समीतीलचे अध्यक्ष वर्षा मनवर, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकरी अविनाश गुरनुले, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गडचिरोली शहरात 18 वर्षाखालील बालकांना ताब्यात घेण्याकरिता वेगवेगळ्या भागात धाळसत्र मोहिम राबविण्याकरिता एकुण 3 टिम बनवण्यात आले. प्रत्येक टिम वेगवेगळ्या भागात जावून संपुर्ण गडचिरोली शहरात वेगवेगळया दुकानात काम करित असतांना बालक दिसल्यास त्याला पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेवून 21 अल्पवयीन बाल कामगारला त्याच दिवशी बाल कल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले. सदर शोधमोहिम मा निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल कामगार शोधमोहित अभियान राबविण्यात आले. सदर टिममध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, एक्सेस टु जस्टीस प्रकल्पाचे व्यवस्थापक इतिहास मेश्राम, चॉईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक अविनाश राउत, सामाजिक कार्येकते जयंत जथाडे, तनोज ढवगाये, क्षेत्र कार्यकर्ता रविद्र बंडावार, निलेश देशमुख, लुकेश सोमनकर, वैशाली दुर्गे, देवेंद्र मेश्राम, वैभव सोनटके, यानी शहरात मोहिम राबविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.13 जून 2023, एकूण निर्णय -10  

Tue Jun 13 , 2023
मदत व पुनर्वसन विभाग सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!