महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु, 288 मतदारसंघांसाठी ‘इतके’ उमेदवार रिंगणात

– महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या धामधुम सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडीमध्ये अशी लढत पाहायला मिळणार आहे.

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचा अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच धांदल उडाली. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

7 हजार 995 उमेदवार रिंगणात

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यात अखेरच्या एका दिवसात 4 हजार 996 उमेदवारांचे एकूण 6 हजार 484 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील 288 मतदारसंघांत एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

15000 नियमित पगार घेणारा ग्रा.पं. दिवाबत्ती कर्मचाऱ्याने विद्युत खांबावरील व तारांवरील झूटपांची छटाई करण्याचे काम सोडून स्वतःचे इतर कामे करण्यासाठी ठेवला 300 रुपये हप्त्याच्या खाजगी माणूस 

Wed Oct 30 , 2024
कोदामेंढी :- येथील ग्रामपंचायतचे नियमित दिवाबत्ती कर्मचारी म्हणून नथू सोनटक्के यांना गावातील एकूण लोकसंख्या फक्त 3829 व विद्युत खांबाची संख्या फक्त 296 असूनही गावातील व गावाबाहेरील रस्त्याच्या एका बाजूने असणाऱ्या पथदिव्याच्या देखभाल दुरुस्ती व पथदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे दहा वर्षांपूर्वीपासून नियुक्ती करण्यात आलेले आहे .मात्र ते ग्रामपंचायतीच्या पगार नियमित घेत असूनही विद्युत खांबावरील देखभाल दुरुस्ती नियमित करत नसल्याने गावाबाहेरील व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com