निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक संपन्न

पुणे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. निवडणूकीसाठी राजकीय पक्षांना आवश्यक साहित्य व प्रचारासाठीच्या विविध बाबींचे दर निश्चित करताना जिल्ह्याच्या विविध भागातील आणि जिल्ह्याबाहेरील दरांची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश जिलहधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.

बैठकीला निवडणूक खर्च समन्वय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रकारच्या निवडणूक खर्चाबाबत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. दरनिश्विती करताना राजकीय पक्षांनादेखील प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

Fri Feb 23 , 2024
पुणे :- भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे महिला बचत गटांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले. कार्यक्रमाला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रेवणनाथ लबडे, सहाय्यक मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com