वाडी :- १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या लावा ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जवळपास सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केल्याचे दिसून आले आहे.यात समता पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहल भांगे,अपना पॅनल च्या जोत्सना नितनवरे,ग्रामविकास लोकसेवा युवा पॅनलच्या शारदा मरस्कोल्हे व इतरही उमेदवार भाग्य आजमावत आहेत.
सदस्य पदाकरिता वॉर्ड क्रमांक ३ चे अधिकृत उमेदवार माजी उपसरपंच महेश चोखांद्रे, सुजाता जामणिक, चंद्रशेखर टेंभरे तर वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार अनिल गोमाजी पाटील,प्रीती सचिन गिऱ्हे, भाग्यरथी शेषराव पुसाम इत्यादींनी सर्वप्रथम सोनबाबाबा मंदिर,बिरसा मुंडा,गणपती मंदिर येथे पूजा अर्चना करून प्रचाराचा नारळ फोडला.तदनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी या उमेदवारांसोबत मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या निवडणुकीत रामभाऊ पाटील, दिलीप तिवारी, शिल्पा शिरसाट,जितेश पिढेकर, मंदा वरठी,जया पिचकाटे, मदन रामटेके,संतोष पाल,लीला पांडे इं.उमेदवारही प्रचाराला लागल्याचे दिसून आले.
समता पॅनल चे महेश चोखांद्रे यांनी सांगितले की, सर्व उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेतला व गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे वचन दिले.यावेळी सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहल भांगे तर वार्ड क्रमांक ३ चे उमेदवार महेश चोखांद्रे,सुजाता जामणिक, चंद्रशेखर टेंबरे,तर वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार अनिल पाटील, प्रीती गिर्हे व भाग्यरथी पुसाम यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता विजयी हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारांनीही या उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.दुसरीकडे माजी जि.प.सदस्य सुजित नितनवरे,माजी जि.प.समाजकल्याण सभापती मधुकर बर्वे, कांग्रेस चे रॉबिन शेलारे, बसपाचे राजकुमार बोरकर यांनी ही विजया चा दावा केला आहे. मतदार कुणाला कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.