मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान; म्हणाले, काम सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होत आहे. भाजपचे नेते- कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं वाटतं. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केलं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काल शिवसेनेच्या विजयी आमदारांची एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत तुम्हीच पुन्हा मुख्यमंत्री व्हा, असा सूर शिवसेनेच्या आमदारांचा होता. यावर काम सुरु असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

सगळ्यांचा सुपडा साफ झालाय. विरोधी पक्षनेता होवू शकतं नाही. मोठा विजय आपल्याला मिळालेला आहे. आपले थोड्या मतांनी पडलेलं आहेत. आज 67 वर गेलो असतो. काही आपल्या निवडणुन येण्याचा स्ट्राइक रेट जनतेनं आपल्याया आशीर्वाद दिला. आपल्याला आणखी वाढवायचं आहे. निवडणून आले त्यांना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या काम सुरू आहे. महायुती एकसंघ आहे. महायुतीत वितूष्ट येईल असं कुठलंही वक्तव्य कुणीही करू नका, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

शिंदेंची गटनेते पदी एकमताने निवड

शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सर्व 57 आमदारांची मुंबईतील ताज लँडमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत चार ठराव मंजूर झाले. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी एकमताने निवड झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना संबोधित केलं. लाडक्या बहिणीचा विजय असो… तुमचं स्वागत करतोय. लाडक्या बहिणींनी इतिहास घडवलं आहे. आपण विकासाचं काम तसेच कल्याणकारी काम आहे. यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. बहीण लडकी आणि विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. काही लोकं फिट येऊन पडले. लाडक्या बहिणीमुळे विजय मिळवला आहे. विरोधी पक्षाकडे संख्याबळ देखील राहिलं नाही. सगळा सुपडासाफ केला आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेचं आहे, असं शिंदे म्हणाले.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

Mon Nov 25 , 2024
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त शरद पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार आणि निलेश लंके देखील होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रीतीसंगमावर सुरू असलेल्या भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. शरद पवार आणि रोहित पवार हे देखील काही काळ स्थिरावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!