समाजाचा दातृत्व भाव जागवण्यासाठी ग्रामायणचे प्रयत्न – श्रीधरराव गाडगे 

– देशातील अनेक व्यवस्था परंपरेने एनजीओने चालवल्या – फणशीकर

– टीसीएस,डब्ल्यूसीएल यांच्या सीएसआर ची माहिती

– अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे उद्घाटन 

नागपूर :- माणसाला जगण्यासाठी भौतिक उन्नती आवश्यक असते, पण त्याचबरोबर मानसिक आणि सामाजिक उन्नतीदेखील महत्त्वाची आहे. अभ्युदय म्हणजे केवळ भौतिक प्रगती नाही, तर तो त्या समाजाचा सांस्कृतिक आणि वैचारिक प्रगल्भतेचा पाया असावा लागतो. आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा ग्रामयान प्रतिष्ठानने जोपासल्याचे गौरवोदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी केले.

फ्रेंडस् को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या सहकार्याने ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भ व महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्यासाठी अभ्युदय सेवा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन तात्या टोपे सभागृह, तात्या टोपे नगर, पश्चिम न्यायालय मार्ग, नागपूर येथे शनिवारी, ९ नोव्हेंबरला पार पडले.

उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून टीसीएस नागपूरचे आनंद आकनुरवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, डब्लूसीएल, नागपूरचे सीएसआर/वेलफेअर जनरल मॅनेजर अनिलकुमार सिंग, अमरस्वरूप फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक मनिष मेहता, सेवा सदन संस्था, नागपूरच्या सचिव वासंती भागवत, दैनिक हितवादचे मुख्य संपादक विजय फणशीकर, यवतमाळ अर्बन बँक अध्यक्ष नितीन खरचे, फ्रेंडस् को-ऑप. हायसिंग सोसायटीचे सुरेश देशपांडे, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित होते.

दैनिक हितवादचे मुख्य संपादक विजय फणशीकर म्हणाले, सरकार आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसल्याने समाजाच्या विकासासाठी एनजीओ स्थापन कराव्या लागतात. समाजाच्या गरजा आणि देशाच्या विकासासाठी एकत्रित कार्य करणं आवश्यक आहे. समाज आणि सरकार एकत्र येऊन सेवा कार्य केले तर समाज जीवन अधिक समृद्ध होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सेवा संस्था मोठे योगदान देत आहेत, असेही ते म्हणाले.

अमरस्वरूप फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक मनिष मेहता यांनी कबाड़ से जुगाड़ उपक्रमाबाबत सांगितले की घराघरात कबाड वस्तू असतात. अनेक वेळा, फोन आल्यावर आम्ही या वस्तू गोळा करतो आणि नंतर ती गडचिरोलीतील आदिवासी लोकांना दान म्हणून पाठवतो.

टीसीएस नागपूरचे आनंद आकनुरवार यांनी टीसीएसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील लहान गावांमध्ये आमचे काम सुरू आहे, विशेषत: गडचिरोलीमध्ये, जिथे हृदय एनजीओच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये मुख्यतः एप्लिकेशन डेव्हलपमेंटचा समावेश आहे, कारण आमचा उद्देश नागपूरच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या लहान गावांपर्यंत पोहोचण्याचा आहे. या प्रयत्नांत आम्ही टेक्नॉलॉजी वापरण्याचा विचार करत आहोत, जे घरच्या घरी सहज वापरता येणारे असे मॉडेल्स तयार करण्यात मदत करतील. यामध्ये वेबसाईट निर्माण, विविध डिजिटल सेवा यांचा समावेश असल्याचे सांगितले.

यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झालीत. प्रास्ताविक व परिचय चंद्रकांत रागीट यांनी केले तर कार्यक्रम संचालन व आभार एड. जयश्री अतकरी यांनी केले.

कार्यक्रमाला सचिव संजय सराफ आणि अभ्युदय प्रकल्प संचालक श्री अनिरुद्ध केळकर आणि अभुदय समन्वयक मंजुषा रागीट आणि ग्रामायणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जीवघेण्या धुळीमुळे कामठीकरांचे आरोग्य धोक्यात

Mon Nov 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून प्रगतीपथावर असून या पुलाचे काम अजूनही अर्धवट रखडलेले आहे तसेच या पुलावर घालण्यात आलेली राखेची धूर ही उडत असल्याने या पुलाच्या कडेला असलेल्या निमुळत्या एकल रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतूकदार,शालेय महाविद्यालयीन विदयार्थी वर्ग तसेच या पुलाच्या कडेला असलेल्या लोकवस्तीतील राहिवासी नागरिकांना या राखग्रस्त धुळीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com