दिव्यांगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा – बच्चु कडु यांनी घेतला आढावा

guभंडारा :- दिव्यांग व्यक्तीविषयी सदभावना व सहानुभुती ठेवून शासकीय चौकटीतून बाहेर पडून अधिका-यांनी दिव्यांगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित अधिका-यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,पोलीस अधिक्षक लोहीत मतानी उपस्थित होते.यावेळी समाजकल्याण तसेच आरोग्य्‍ विभागाने पुढाकार घेऊन दिव्यांग प्रमाणपत्राचे काम जलदगतीने करावे, असे कडू यांनी निर्देश दिले.संजय गांधी निराधार योजना व कृषी विभागाने दिव्यांग नागरिक व शेतकऱ्यांपर्यत पोहोचून त्यांना लाभ दयावा.स्थानिक रोजगार क्षेत्रात नगरपालीकेने दिव्यांगांना रोजगार उपलब्ध् होईल असे पाहावे तसेच मुक बधिरांच्या अडचणी समजून घेण्यासाठी साईन लॅग्वेज तज्ञाची नेमणुक करावी असेही कडू यांनी निर्देश दिले.पुढील दोन महीन्यांनी पुन्हा या योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.आजच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबददल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर शहर अल्पसंख्यक कांग्रेस कमेटी ने धम्मचक्र प्रवर्तन दिवस बनाया

Sun Oct 15 , 2023
– मध्य नागपुर ,बरसे नगर में अपसंक्यक कांग्रेस कार्यकर्ताओ ने बनाया धम्मचक्र प्रवर्तन दिवस – वसीम खान ने अपने सैकड़ों पदाधिकरी एव कार्यकर्ताओ के साथ रात १२ बजे डॉ बाबा साहेब आंबेडकर कि प्रतिमा पर माल्यार्पण कर नमन कियाhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिवस भारतीय बौद्धों का एक प्रमुख उत्सव है। प्रतिवर्ष बौद्ध अनुयाई एकत्रित होकर अशोका विजयादशमी 14 अक्टूबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com