ट्रक कंटेनर च्या धडकेने ईसमाचा मृत्यु.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विहीरगाव मार्गावर ट्रक क्र एम एच 31 सी जी 4781 चा चालक हा ट्रक च्या बाजूला उभा असताना मागेहून येत असलेल्या ट्रक कंटेनर क्र एम एच 46 बी एफ 8508 च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि होऊन मृत्यू पावल्याची घटना गतरात्री साडे बारा दरम्यान घडली असून मृतक ट्रक चालकाचे नाव जितेंद्र शुक्ला वय 43 वर्षे रा कन्हान असे आहे तर या घटनेतील आरोपी ट्रक कंटेनर चालक अक्कलउद्दीन अहमद अली वय 26 मालतूर उत्तरप्रदेश विरुद्ध भादवी कलम 279, 338, 304 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत

Sat Aug 6 , 2022
केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश   मुंबई, दि. 6– अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री,मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे             शासनाने दि. 4 ऑगस्ट ,2022 च्या आदेशान्वये मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले आहेत. हे अधिकार केवळ अर्धन्यायीक [ क्वासी जुडीशियल ] प्रकरणे दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com