समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी नवरात्रोत्सवात शैक्षणिक साहित्यांचा जागर

– एक वही एक पेन अभियानचे आवाहन 

मुंबई :- आर्थिक अडचणींमुळे दुर्गम भागात राहणाऱ्या समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी येत्या नवरात्र उत्सवात देवदर्शन करताना पूजेच्या साहित्यासह शैक्षणिक साहित्यदेखील देवीसमोर अर्पण करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात गणेशोत्सवासह नवरात्र उत्सव देखील नऊ दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो या उत्सवात लाखो रुपयांची उधळण होते यावर्षी येत्या १४ आकटोबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे , यावेळी होणारे अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी वह्या ,पेन ,पुस्तके पेन्सिल कंपास वापरात नसलेले मोबाईल लॅपटॉप सार्वजनिक नवरात्र उत्सवात देवीला अर्पण करून शैक्षणिक साहित्याचा जागर करावा नवरात्र उत्सव मंडळांनी देखील भाविकांना तसे आवाहन करावे. नऊ दिवसात जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वितरित करावे किंवा एक वही एक पेन अभियानकडे सुपूर्द करावे असे आवाहन या अभियानचे प्रमुख जेष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे .समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी किंवा या अभियानच्या अधिक माहितीसाठी सार्वजनिक उत्सव मंडळे ,दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील या अभियानच्या वतीने करण्यात आले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केवळ पिवळ्या रंगाच्या शर्टवरून तस्कराला अटक

Fri Oct 6 , 2023
– ओडिशाहून आणलेला गांजाची विदीशात होती डिलिव्हरी, रेल्वेच्या तिकीट केंद्रातून अटक नागपूर :-पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम रेल्वेने अंमलीपदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या छोट्याशा माहिती वरून लोहमार्ग पोलिसांनी तस्कराच्या मुसक्या आवळल्या. गंगाराम अहिरवार (45) रा. विदीशा (भोपाळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सव्वासहा किलो गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com