भंडारा :- जिल्हा कोषागार कार्यालय, यांच्या वतीने आयोजित ई-कुबेर व राष्ट्रीय निवृत्ती वेतन बाबत चर्चासत्र/ कार्यशाळा यशस्वी पणे समाज कल्याण भवन हॉल मध्ये जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मंगला डोरले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यशाळेस 275 पेक्षा अधिक आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपिस्थत होते. सदर कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी सोनी हे उपस्थित होते. त्यांनी देखील उपस्थितांना देयकासंबंधी नियमांशी सम्बधी मार्गदर्शन तसेच सूचना केले.
कार्यशाळेत ई कुबेर बाबत जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले व अप्पर कोषागार अधिकारी (संगणक) प्रवीण पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश मगर यांनी ई-कुबेर प्रणाली बाबत , योगेश कावळे यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतनाबाबत तसेच सेवार्थ प्रतिनिधी सचिन देवगडे यांनी सेवार्थ विषयक सखोल मार्गदर्शन केले व तसेच आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.
सदर कार्यशाळेस मंचावर उपस्थित प्रवीण पत्की अप्पर कोषागार अधिकारी (संगणक), प्रभारी अप्पर कोषागार अधिकारी (अंकेक्षक) अमित कोठे, प्रभारी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) स्वाती ईश्वरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतिश मगर यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषागार कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य प्रकारे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.