संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी भगवान श्रीराम जयंती शोभायात्रा, महावीर जयंती ,हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ,रमजान ईद या पर्वावर विविध जातीय धर्माच्या नागरिकांनी आपसी मतभेद विसरून एकत्र येऊन सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून एकता निर्माण करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपयुक्त श्रवण दत्त यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले शांतता समिती सभेची सुरुवात पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांचे हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस उपयुक्त पी एन नरवाडे, नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर ,जुने कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे ,नायब तहसीलदार अमर हाडा ,विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता एस राठोड ,कामठी नगर परिषदेचे विजय मेथीया ,विक्रम चव्हाण उपस्थित होतेे.
सभेत इकबाल कुरेशी ,आयफास ठेकेदार ,जयराज नायडू, लाला खंडेलवाल ,आबीद ताजी, सुगंत रामटेके यांनी विविध सण उत्सवा दरम्यान कामठीतील मुख्य मार्गावर घाण व स्वच्छतेची समस्या असून मुख्य मार्गावर विविध प्रकारचे बिल्डिंग मटेरियल पडलेला असतो त्यामुळे शोभायात्रेचे झाकी रथ जाण्याकरिता वाहतुकीला अडचण होत असते शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत शोभायात्रेदरम्यान भार नियम होऊ नये या प्रकारचे मुद्दे समस्या मांडून सोडवण्याची मागणी केली यावर सभेचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांनी प्रशासनाच्या वतीने आपण ठेवलेल्या सर्व समस्या त्वरित सोडवण्यात येतील शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्यावेळी प्रत्येक नागरिकांनी माझं शहर माझं कर्तव्य समजून कायदा सुव्यवस्थेसाठी नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक नवीन कामठीचे ठाणेदार भरत क्षीरसागर यांनी केले संचालन रोशन यादव यांनी केले व आभार प्रदर्शन अखिलेश ठाकूर यांनी मानले सभेला अफाज ठेकेदार, दीपंकर गणवीर ,राजेश गजभिये,सुमित गेडाम,अनुभव पाटील,विकास रंगारी,सुगत रामटेके ,रिजवान कुरेशी, प्रकाश लाईनपांडे, इकबाल कुरेशी, कमल यादव ,जयराज नायडू, लाला खंडेलवाल, राजू पोलकमवार, कमल यादव, सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.