संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी पंचायत समितीच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार
कामठी ता प्र 8 :- मागील दोन वर्षात सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सर्व कोरोना योद्धांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता समर्पण आणि सेवा ह्या स्थायी भावनेने आपली कर्तव्यदक्ष भूमिका साकारली .ही कामगिरी कौतुकास्पद असून त्यामुळेच कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणू शकले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे.ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत असे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी आज कामठी पंचायत समिती कार्यालयात आयोजित कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमा अंतर्गत सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य विभाग, अधिकारी , कर्मचारी, पत्रकार बांधव यांचा कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार , पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी ,आदींनी एकत्र येत कोरोना योद्धा चा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी कामठी तालुका प्रशासनासह येथील कोरोना योद्धानी पुढे सरसावत जनतेत जन जागृती करून त्यांना धीर देत अहोरात्र मेहनत घेवून कामठी तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळविले एवढेच नव्हे तर अनेक अडचणी ना पुढे जात आपले कार्य चोखपणे बजावले व ते आजही त्याच जोमाने कार्यरत आहे. याच बरोबरीला अनेक समस्या असताना आरोग्य विभागासह आदी प्रशासनिक अधिकारी , कर्मचाऱ्यांनी कारभार सुरळीत चालू ठेवला. सोबत पोलिस प्रशासनाने उत्तम कार्य बजावले याशिवाय पत्रकार बांधवांचे सुध्दा मोठे योगदान राहिले.काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून लॉक डाऊन काळात गरीब जनतेला अन्नदानाचे अविरत बरेच दिवस कार्य केले. त्यामुळे या योद्धा चा कुठे तरी सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे हा उदांत हेतू पुढे ठेवून कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या पुढाकारातून सर्वांनी एकत्र येत कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम घडवून आणला असल्याचे समयोचित मनोगत पंचायत समितीचे सभापती उमेश रडके व उपसभापती आशिष मल्लेवार यांनी व्यक्त केले तर कोरोना हे अजूनही गेलेला नसून जनतेने योग्य दक्षता घेणे गरजेचे असून यावर कोणती काळजी घ्यायचे यावर मार्गदर्शनपर मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी व्यक्त केले.सदर कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम कामठी पंचायात समितीचे सभापती उमेश भाऊ रडके यांच्या अध्यक्षते खाली व उपसभापती आशिष मल्लेवार, गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, पंचायत समितीचे सदस्य दिलीप वंजारी, सुमेध रंगारी, सविता जिचकार, पूनम माळोदे, कांचन कुथे, दिशा चनकापुरे व सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले तालुका आरोग्य कार्यालयातील तालुका आरोग्य अधिकारी संजय माने यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी ग्रामीण भागातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी डॉटर तिवारी ,डॉक्टर राऊत, डॉक्टर बाके व इतर वैयद्यकीय अधिकारी ,सामुदायिक आरोग्य अधिकारी,औषध निर्माण अधिकारी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहयिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, इतर कर्मचारी, नागरी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर शबनम खाणुनी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी . मनीष दिघाडे, . गोपीचंद कातुरे, तालुक्यातील सर्व पत्रकार, तसेच कोरोना काळात कोरोना आजाराने मरण पावलेल्या लोकांचे अंतिम संस्कार करण्यासाठी शव वाहून नेणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजितकुमार अढाऊ, अक्षयकुमार मंगरूळकर, राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर, गणेश पिंपळे, राजू काळे व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.