संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जीवन जगत असताना माणसाच्या अन्न ,वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस जीवनभर धडपड करीत असतो पण आरोग्याची काळजी घेणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळविणे हे एक आव्हानात्मक ठरते तेव्हा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कामठी शहरातील रॉय हॉस्पिटल व चौधरी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या दोन नामवन्त रुग्णालयाची पॅनल वर निवड करण्यात यश मिळविले.या योजने अंतर्गत पॅनल वर नियुक्त उपरोक्त नमूद दोन्ही रुग्णालय रुग्णांना दुय्यम आणि तृतीयक उपचारासाठी कॅशलेस वैद्यकिय सेवा पुरवेल.या योजनेतून जनतेला गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी पूर्णपणे निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट् शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सुरू केलेली योजना आहे या योजने अंतर्गत लाभार्थ्याना दीड लक्ष रुपये आरोग्य विमा कवच दिले जाते.आपल्यामूलभूत गरजा तर सर्वच पूर्ण करतात पण जनतेच्या आरोग्याची गांभीर्याने काळजी घेऊन जनतेसाठी कामठी शहरातील दोन रुग्णालयाची पॅनल वर केलेली नियुक्ती ही गोरगरीब नागरिकासाठी जीवनदायी ठरले आहे मात्र ही जीवनदायी सेवा जनतेच्या पदरेत घालून खऱ्या ,जवाबदार व कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींचे भूमिका साकारणारे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामठी शहर वासीयांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.
या योजनेत विविध रोगावर आणि उपचारावर कव्हरेज दिले जाणार आहे ज्यात गंभीर आजारावर उपचार, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवांचा समावेश आहे तसेच पॅनल वर नियुक्त करण्यात आलेले रॉय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ रतन रॉय सर खुद्द सर्जन आहेत ज्यामुळे या योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना अधिकच सोयीचे होणार आहे. तर विकासपुरुष म्हणून ख्यातीप्राप्त पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतत शासकीय योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणीण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहले आणि याच कर्तव्यदक्ष भूमिकेतून कामठी तील दोन रुग्णालये पॅनल वर घेण्यात यश मिळवून नागरी आरोग्य सेवेची भूमिका साकारून जनतेसाठी जीवनदायी योजना नागरिकांच्या घरापार्यंत पोहोचविलो या जीवनदायी योजनेतून बऱ्याच गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल व आरोग्य सेवेचा लाभ मिळणार व नागरिकांच्या सेवेत हे दोन्ही रुग्णालय जीवनदायी ठरणार.