संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-मासेमारी व्यवसाय संकटात
कामठी :- यावर्षी उन्हाळा चांगलाच तापला असून पावसाळा तोंडावर आला तरीही उन्हाचा प्रकोप कमी होताना दिसत नाही परिणामी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.त्यामुळे कामठी तालुक्यातील नदीचे पाणी काही प्रमाणात आटले असून तलावातील पाणी नाहीसे होत असल्याने यंदा मासेमारी व्यवसाय करणारा ढिवर भोई समाज आर्थिक संकटात सापडला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ,असा प्रश्न या ढिवर समाजाला पडला आहे .
राज्य शासनाने या समाजाला व त्यांच्या मासेमारी व्यवसायाकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याने त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.यावर्षी उन्हाळ्याचा तापमान अति उष्ण असल्यामुळे काही प्रमाणात असलेले तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर असल्याने येथील मासोळ्या मरण पावल्या जात आहेत.ढिवर भोई समाजाचे जीवनमान या मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे मात्र या व्यवसायावर असलेल्या अवकाळी संकटामुळे या समाजापुढे स्वतःचा व परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा ?असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे