सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 365 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (12) रोजी शोध पथकाने 365 प्रकरणांची नोंद करून 102100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 93 प्रकरणांची नोंद करून रु 37200 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला.कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 137 प्रकरणांची नोंद करून 13700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 42 प्रकरणांची नोंद करून रु 16800 दंड वसूल करण्यात आला. दवाखाने, इस्पितळे, पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन रु 2000 दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करुन रु 4000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 77 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 15400 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपद्रव करणा-या संस्थांकडून 13 प्रकरणांमध्ये 13000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरात आतापर्यंत ५७ डेंग्यू रुग्णांची नोंद

Thu Oct 13 , 2022
नागपूर :- नागपूर शहरात 10 महिन्यात ५७ डेंग्यू रुग्णांची आणि २ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. डासांपासून होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी. कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. नागपूर शहरातील डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची माहिती मनपाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com